Breaking News

सैराट दक्षिणेतही होणार रिलिज

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता दक्षिणेतील थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. आता हा चित्रपट चेन्नई आणि केरळमध्ये रिलीज होणार असल्यामुळे तेथील बॉक्स ऑफिसवर कसा धुमाकूळ घालतो याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट 29 एप्रिलला रिलीज झाला. आतापर्यंत या चित्रपटाने 80 कोटीहून अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश यात शंकाच नाही. शुक्रवारी केरळमधील थिएटरमध्ये तर शऩिवारी चेन्नईमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. येथे सैराटचे लिमिटेड शोज दाखवले जाणार आहेत.