माण तालुक्यात मेंढ्यांच्या कळपावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला
बिजवडी, दि. 12 (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील वावरहिरे परिसरात गेल्या काही दिवसात 15 ते 20 मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने वारंवार शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून अनेक शेळ्या-मेढ्यांचा फडशा पाडला असून त्याच टोळक्याने बिजवडी व जाधववाडी परिसरातील शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवत 6 मेंढरांच्या मानेचे लचके तोडल्याने त्या मेंढ्यांचा मृत्यू झाला असून 6 मेंढ्या गंभीर जखमी झाल्याने मोकाट कुत्र्यांची धास्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिजवडी येथील नवनाथ काकडे यांच्या मेंढ्यांचा कळप चरण्यासाठी जात असताना अचानक आलेल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने कळपावर हल्ला चढवत दोन मेंढ्यांच्या मानेचे लचके तोडल्याने त्यांचा जागीच मृत्यू पावल्या तर चार जखमी झाल्या. त्या टोळक्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र तेच टोळके जाधववाडी येथील मल्हारी बाजी जाधव यांच्या मेंढराच्या कळपात घुसले. त्यांनी केलेल्या ा हल्ल्यात मेंढ्या सैरावैरा धावू लागल्या. मात्र कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने मेंढ्या गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर पडू लागल्यानंतर कुत्र्यांना हुसकावण्यात यश आले. या हल्ल्यात चार मेंढ्यांचा जागीच मृत्यू पावल्या तर 6 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.