Breaking News

शिवसेनेच्या वतीने आत्महत्याग्रस्तांना बियाणे वाटप

चिखली तालुका, दि. 12 - सततची नापिकी, दुष्काळ व आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग पत्करलेल्या शेतकरी कुटुंबास उभारी व बळ देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. जिल्हयतील 462 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 2 बॅग सोयाबीन बियाणे व 2 बॅग खत घरपोच व मोफत देण्यात उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना शिवसेना व युवा सेनेच्यावतीने 5 जून रोजी घरपोच खते व बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेना व युवा सेनेच्या या उपक्रमांतर्गत जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आमखेड, कोलारा, गांगलगाव, मेरा बु., मनुबाई, अंचरवाडी, शेळगाव आटोळ, मेरा खुर्द या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास 2 बॅग सोयाबीन बियाणे व 2 बॅग खताचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रतापसिंग राजपूत, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उपतालुका प्रमुख प्रवीण वराडे, कृष्णा जाधव, प्रदीप वाघ, गजानन कुटे, तानाजी चिकने, विलास घोलप, पंजाबराव गावडे, रमेश म्हस्के, राधेश्याम पाटील, दिनकर चौधरी, कुंदन सपकाळ, राहुल येवले यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिकांची उपस्थिती होती.
खा.प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील 43 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना 4 जून रोजी घरपोच खत व बियाण्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. आज रोजी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी विविध संकटाशी सामना करीत आहे. त्यामुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहे. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललेला असून शेतक-यांच्या आत्महत्येमुळे शेतक-यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त होते. अशावेळी शासनस्तरावरुन थोडीफार मदत होतेच, परंतु समाजातील लोकांनीही त्यांना मदत व धीर दिला पाहिजे.. या हेतूने जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुलडाणा तालुक्यातील 43 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना खत व बि-बियाणांचे वाटप केले. यावेळी प्रत्येक कुटुंबांना दोन बॅग सोयाबीन व दोन बॅग खताचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अर्जुन दांडगे, जिल्हा परिषद विरोध पक्ष नेते अशोकराव इंगळे, उपतालुका प्रमुख गजानन टेकाळे, माणिकराव सावळे, विजय इतवारे, संजय जाधव, गजानन बिलारी, दादाराव राऊत, दत्ताभाऊ चव्हाण, विभागप्रमुख अनिल जगताप, सुमंता इंगळे, कृष्णा धंदर, गजानन धंदर, प्रताप वाघ, सुरेश धनावत, डॉ.पवार, नंदु देशमुख, संजु जुंबड, दिनेश गवते, गजानन रोजेकर, गजानन देशमुख, उध्दव भोंडे, रवि धनावत, उपविभागप्रमुख किसान सेना पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.