सातारा जिल्हा परिषदेचे ‘अध्यक्ष’पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा महिलाराज येणार आहे. खुल्या प्रवर्गातून अध्यक्षपद मिळवण्यासाठी मातब्बरांमध्ये सुरू झालेली रस्सीखेच आता थांबली आहे.
राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर ते मार्च 2017 अखेर होणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची पुनर्रचना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढली. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला राखिव झाले आहे. मात्र, गट व गणाच्या पुनर्रचनेनुसार व कोणत्या गटाला व गणाला कोणते आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदांचे दावेदार महिला पुढे येणार आहेत. यापूर्वी औंध येथील श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, बावधन येथील सौ. अरूणादेवी शशिकांत पिसाळ यांनी महिला खुला या प्रवर्गातून अध्यक्षपद भूषविले. विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सर्वसाधारण महिला गटात 22 महिला प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, त्यांच्या जिल्हा परिषद गटात आरक्षण काय राहणार? यावर त्यांची पुढची टर्म अवलंबून राहिल. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले व्हावे यासाठी अनेक नेते टपून होते. मात्र, अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. विशेषत: बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे-पाटील, अमित कदम, वसंतराव मानकुमरे, किरण साबळे-पाटील, सुरेंद्र गुदगे, सतीश फडतरे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, विक्रमबाबा पाटणकर, संजय देसाई अशा जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या व अध्यक्ष होण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांचा आपेक्षा भंग झाला आहे. त्यांच्या मतदार संघात आरक्षण काय पडणार यावरच त्यांचे भवितव्य ठरणार आहे.