मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत वेंकटेश प्रसादही
मुंबई, दि. 09 - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि संदीप पाटील यांच्यापाठोपाठ वेंकटेश प्रसादने अर्ज दाखल केल्यामुळे संदीप पाटील आणि रवी शास्त्री यांच्यानंतर दाखल झालेल्या वेंकटेश प्रसादच्या अर्जाने मुख्य प्रशिक्षकपदाची चुरस चांगलीच वाढली आहे. याआधी बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवि
शास्त्री यांनीही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यापाठोपाठ निवड समिती सदस्य विक्रम राठोड, प्रवीण आमरे, लालचंद राजपूत आणि ऋषिकेश कानिटकर अशी मोठमोठी नावे या पदाच्या शर्यतीत दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड चांगलीच चुरशीची ठरणार आहे. प्रसादकडे सध्या भारतीय नियामक मंडळाच्या कनिष्ठ खेळाडू निवड समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. तो आता वरिष्ठ खेळाडूंचा प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक आहे. यापूर्वी प्रसादने गोलंदाज प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी पेलली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली 2007 चा टी20 विश्वचषकही भारताने जिंकला होता.
प्रसादने भारताकडून 33 कसोटी आणि 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 96 तर एकदिवसीय सामन्यात 196 बळी घेतले आहेत. पाकिस्तान विरोधात 27 धावांत 5 गडी बाद केल्याची खेळी ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. डंकन फ्लेचर निवृत्त झाल्यानंतर रवि शास्त्री यांनी अठरा महिने भारतीय संघाच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली होती. ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर रवि शास्त्री यांच्या कराराची मुदत संपली. त्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी एक जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. तूर्तास, संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शास्त्री हेच आघाडीवर असल्याचे मानले जाते.
विद्यमान निवडकर्ते व माजी प्रशिक्षक संदीप पाटील यांनीही प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज यापूर्वीच दाखल केला आहे. संदीप पाटील यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. पण, त्यांची ती पहिली इनिंग अपयशी ठरली होती. दरम्यान, रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असला तरी सहायक पथकातील त्यांचे जुने सहकारी संजय बांगर, आर. श्रीधर व भरत अरुण यांनी मात्र नामांकन भरलेले नाही. संधी मिळाल्यास आपली मागील जबाबदारी पूर्ववत सुरु करण्यासाठी ते उत्सुक असल्याचे मानले जाते.