Breaking News

पंतप्रधान मोदींना महिला तहसीलदारचा अजब सल्ला

रतलाम, दि. 09 -  पुन्हा एकदा आपल्या फेसबुक पोस्टबाबत अनेकदा वादात सापडणा-या तहसीलदार अमिता सिंग चर्चेत आल्या आहेत. आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकीकडे कौतुक केले. तर दुसरीकडे त्यांना ‘राजीव गांधी आत्महत्या योजना’ सुरू करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
त्यांना आपल्या फेसबुक वॉलवरून यानंतर वाढलेल्या वादामुळे पोस्ट हटवून माफी मागावी लागली. आपल्या व्हॉट्सऍपवर हा मॅसेज आला होता, जो आपण फेसबुकवर पोस्ट केला असे महिला तहसीलदाराचे म्हणणे आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानात गेले, तेथे मुसलमानांनी भारताचे झेंडे घेऊन रस्त्यावर ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. यामुळे पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी ‘राजीव गांधी आत्महत्या योजना’ सुरू करावी, जेणेकरून धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसी विचारवाले असे वृत्त ऐकून आत्महत्या करू शकतील असे त्यानी फेसबुक वॉलवर लिहिले होते. यानंतर महिला तहसीलदारच्या या पोस्टला सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. कोणालाही वाईट वाटू नये यासाठी माफी मागितल्याचे स्पष्टीकरण महिला अधिका-याने दिले.