स्वस्त दारात औषधे ः सावेडीमध्ये जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटन
। सावेडीमध्ये गोरगरीब रुग्णांना लांब जाण्याची आता गरज नाही ः आ.अरुण जगताप यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 09 - सावेडी येथे कुष्ठधाम रोडवर लीला सारीजजवळ अनुराग अपार्टमेंट मध्ये स्वामीकृपा जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यामुळे नगरमध्ये आता रुग्णांना स्वस्त दरात औषध आहेत अशी माहिती स्वामीकृपाचे संचालक निलेश अकोलकर यांनी दिली.या उद्घाटनप्रसंगी डॉ. दीपक कारखेले, डॉ. पानसंबळ, डॉ. नानासाहेब अकोलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मनीषा गुंड, आ. अरुणकाका जगताप, महापौर अभिषेक कळमकर, सौ. सविता मोरे, सौ. विना बोज्जा, दशरथ शिंदे, मनोज दुल्लम, जेनेरिक चे महाराष्ट्राचे प्रमुख संतोष शेंडगे
, तसेच बाळासाहेब पुलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सावेडीमध्ये गोरगरीब रुग्णांना लांब जाण्याची आता गरज नाही. संपूर्ण नगर शहरातील लोकांना याठिकाणी स्वस्त दारात औषधे उपलब्ध झाल्यामुळे रुग्णाची आर्थिक बचत होणार आहे असे प्रतिपादन आ. अरुणकाका जगताप यांनी केले. हि जेनेरिक औषधे मधुमेह, अपचन, लकवा मारणे, केसांचे गळणे, मासिक पाळीच्या समस्या, दातदुखी, डोकेदुखी , खाज व उसम, अल्सर , लट्ठपणा, असिडीटी, पित्त होणे , मुळव्याध, लहान मुलांच्या समस्या, एच. आय. व्ही, यासारख्या भयंकर आजारांवर काम करतात. पूर्वी या औषधांसाठी रुग्णांना पुणे आणि मुंबईला जावे लागत असे, पण आता नगरमध्येच हि औषधे उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. हे सर्व आजार असणार्या रुग्णांनी हि औषधे घेऊन आपल्या पैशांची बचत करावी असे आवाहन ’स्वामीकृपा’ च्या संचालकांनी केले आहे. रुग्णांना औषधाची किंमत आणि इतर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी रुग्णांनी 9881372037 या क्रमांकावर संपर्क साधूनही माहिती घेऊ शकता अशी माहिती संचालकांनी दिली.औषधात असणार्या केमिकलच्या नावाला जेनेरिक असे संबोधले जाते. जेनेरिक औषधे हि इतर औषधांपेक्षा तीस ते सत्तर टक्के स्वस्त असतात कारण कोणतेही औषध तयार करताना त्याच्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. त्यामुळे औषधे तयार करणार्या कंपन्या त्या औषधांचे पेटंट घेतात.
