सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संशोधन समितीवर भैलुमे यांची निवड
कर्जत, दि. 09 - येथील राजाभाऊ विनायक भैलुमे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या संशोधन व मान्यता समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाली. या समितीच्या वतीने विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवला जातो. संशोधनासंबधी वपरीक्षेसंबधी विविध निर्णय घेतले जातात, त्यामुळे अत्यंत महत्वाच्या या समितीवर निवड झालेले कर्जतचे सुपुत्र राजाभाऊ भैलुमे हे आजपर्यंतच्या विद्यापीठाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे अध्यक्ष निवडले गेले असून, कर्जतकरांची मान उंचावली आहे. कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक व राष्ट्रपतीपदक विजेते विनायक भैलुमे यांचे ते चिरंजीव आहेत. या निवडीनंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
