होम हवन करुन सरकारचा निषेध
बुलडाणा, दि. 09 - सारंगवाडी येथील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राम डहाके यांनी प्रकल्पाच्या भिंतीवर होम हवन करुन शासनाचा निषेध केला.
येथून जवळच असलेल्या किन्ही नाईक येथील शेतकर्यांसाठी वरदान ठरु पाहणार्या महत्वाकांशी अशा सारंगवाडी सिंचन प्रकल्पाचे काम काँग्रेस आघाडी सरकारच्या काळामध्ये आ
.राहूल बोंद्रे यांच्या प्रयत्नातुन तब्बल 22 कोटी रुपयांच्या मंजुरीने प्रकल्पाचे काम तत्कालीन जलसंपदा व रोहयो मंत्री नितिन राऊत यांच्याहस्ते भुमीपूजन होवून काम सुरु झाले होते. मागील वर्षापर्यंत 68.86 कोटी रुपयांच्या सुधारीत मंजुरीसह सदर सिंचन प्रकल्पाचे काम 50 टक्के पर्यंत पुर्णही झाले. मात्र आताच्या शेतकर्याप्रति उदासीन असणार्या सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने सदर सिंचन प्रकल्पाकडे हेतुपुरस्सरपणे ढूंकूनही पाहिले नाही. त्यामफळे निर्मानाधीन असलेल्या प्रकल्पाचे काम बंद पडले याचा निषेध म्हणून बु.जि.यु.काँ.महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी होम हवन करुन समाचार घेत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये ज्या शेतकर्यांच्या शेत जमिनी गेल्या आहेत त्यांनाही अद्याप पुरेसा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी ऐन दुष्काळात सरकारने वार्यावर सोडल्यामुळे संकटात सापडला आहे.
सदर प्रकल्पातील पाणी पिण्यास ही आरक्षीत करण्यात आले आहे. म्हणून परिसरातील शेतकर्यांसाठी वरदान ठरु पाहणार्या सारंगवाडी प्रकल्पाचा बंद पडलेल्या कामाकडे पहायला सरकारकडे वेळ नसून मोठ मोठया उद्योग पतीचे कर माफ करायलापैसा आहे. प्रचंड दुष्काळ असतांना शेतकर्यांप्रती उदासीन असणार्या सरकारच्या बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने बंद पडलेल्या प्रकल्पाला भेट देत अर्धवट बांधलेल्या भिंतीवर होम हवन करुन भाजपा सरकारचा निषेध केला.
यावेळी बुलडाणा जिल्हा महासचिव राम डहाके यांचेसह माजी जि.प.सदस्य समाधान सुपेकर चिखली कृउबास माजी प्रशासक छगणसेठ टेकाळे, पुरुषोत्तम ठाकरे, सुरेद्र खपके, सचिन भुतेकर, उंद्री शहर अध्यक्ष मनोज लाहूडकार, धोत्रा नाईक युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष भुरे युवक काँग्रेस ता.स.अनिल राठोड, इशराम भाई सौदागर, शे.गुलाब खा.पठाण, राजु तरळकर, किन्ही नाईक युवक काँ.अध्यक्ष विष्णु ठाकरे, प्रमोद टेकाळे, भागवत वडतकर, नारायण उफाळ यांचे सह परिसरातील बहूसंख्य शेतकरी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.