प्रभाग क्रमांक 11 मध्ये हॉटमिक्स रोडचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
परभणी, दि. 09 - परभणी शहर महानगर पालिका दलितोत्तर निधीमधून 40 लाखाचा हॉटमिक्स रोडचे शुभारंभ महापौर सौ.संगिताताई वडकर यांंच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गणेशराव देशमुख, सौ.शारदाताई मोरे, विजय जामकर, पप्पु मोरे, शहराध्यक्ष नदिम इनामदार, राजेंद्र वडकर यांच्या उपस्थितीमध्ये जाधव गॅस एजन्सी रोड ते शास्त्री नगर पर्यंत मजबुतीकरण हॉटमिक्स रोडचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर सौ.संगिताताई वडकर यांनी शहरातील बर्याच प्रभागामध्ये रोड, नाली, खड्डे बुजविण्याचे काम युध्द पातळीवर चालू आले. लवकरच शहरामध्ये राजगोपालाचारी उद्यान, नेहरू पार्क उद्यान, शिवाजी पार्क उद्यान येथे विकास कामांना सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
उपमहापौर भगवान वाघमारे यांनी प्रभाग क्र. 11 मध्ये दत्तनगर, शास्त्री नगर, जाधव गॅस एजन्सीपर्यंत हॉटमिक्स कामाचे उद्घाटन करण्यात आले. तर उर्वरित प्रभागामध्ये रोड व नाली तसेच मुलभूत सुविधा देण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.
यावेळी कॉलनीतील नागरीक पांडूरंग भवर, संजय मोरे, ज्ञानेश्वर पंडित, अभय देशमुख, शंकर टाक, सुनिल कोकणे, भास्कर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे आदी नागरीक उपस्थित होते.