11 जुलैपासून रेल्वे कर्मचारी बेमुदत संपावर!
नवी दिल्ली, दि. 09 - रेल्वे कामगार संघटना येत्या 11 जुलैपासून नवीन पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपावर जाणार असून 11 जुलैला सकाळी 6 वा.पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस आम्ही रेल्वे व्यवस्थापनाला देऊ, अशी माहिती ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस एस. गोपाल मिश्रा यांनी दिली.
आम्ही आमच्या मागण्या रेल्वे प्रशासनाला सहा महिन्यांपूर्वी सादर केल्या होत्या. परंतु सरकारचा आमच्याकडे पाहण्याच्या तुच्छतेच्या दृष्टिकोनामुळे संप अटळ बनला आहे, असा दावा त्यांनी केला. रेल्वेचे 13 लाख कर्मचारी असून त्यांच्या संपामुळे देशभरातील रेल्वे सेवा ठप्प होईल. त्याचा फटका तमाम देशवासीयांना बसणार आहे. वरील मागण्यांशिवाय रेल्वेतील रिक्त पदे भरण्याची मागणीही युनियन्सने केली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन्स संघटनेनेही या संपाला पाठिंबा
दिला आहे.