Breaking News

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पुण्यात होणार

नवी दिल्ली, दि. 09 -  पुढील वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज यंदाच्या मोसमातील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीच्या ठिकाणांची घोषणा केली. त्यामध्ये कसोटी सामन्यासाठी पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे.
भारत यंदाच्या मोसमामध्ये मायदेशात 13 कसोटी सामने खेळणार असून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे संघ भारत दौर्‍यावर येणार आहेत. या मोसमात भारतीय संघ एकूण 13 कसोटी, आठ एकदिवसीय, तीन ट्वेंटी-20 मायदेशात खेळणार आहे. तर बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांत एकूण 918 सामने खेळविले जातील.
आज या सामन्यांसाठीच्या ठिकाणांची घोषणा झाली.
- न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने : इंदूर, कानपूर, कोलकाता
- इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने : मोहाली, राजकोट, मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने (2017मध्ये) : बंगळूरु, धर्मशाला, रांची, पुणे
- बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी : हैदराबाद