Breaking News

शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरले इंडोनेशिया

मतराम, दि. 09 -  आज इंडोनेशियातील लोंबूक हे बेट शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसून सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. या शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी होती.

या भूकंपाचा धक्का इंडोनेशियामधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बाली बेटावरील पर्यटकांनाही बसला. या भूकंपाचे धक्के तीन ते चार सेकंदांपर्यंत जाणवत होते. भूकंपामुळे भयभीत झालेले नागरिक तातडीने घराबाहेर पडले. इंडोनेशियास कालही शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता. इंडोनेशियातील उत्तर मालुकू प्रांताला काल पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती.