Breaking News

बहुजनांवर ब्रम्हचातुर्याची मोहीनी

हिंदू पुर्वी कोण होते? हिंदू धर्मावर खरा अधिकार कुणाचा? बहुजन खरे हिंदू की ब्राम्हण? ब्राम्हण हिंदू मुळात हिंदू आहेत का? ब्राम्हण हिंदू नसतील तर हिंदू  धर्मावर सत्ता गाजवून अवघ्या बहुजनांना आपले गुलाम बनविण्यात ब्राम्हण यशस्वी कसे झाले? बहुजनांनीही ब्राम्हणांची धर्मसत्ता निमूटपणे कशी स्वीकारली? हे  प्रश्‍न आजच्या पिढीला जर्जर करीत आहेत. एखादी गोष्टी खोटी असली तरी वारंवार थोपविली गेल्यास ती सत्य वाटू लागते. अगदी अस्तित्वात नसलेली एखादी  गोष्टही आभासाने प्रत्यक्षात दाखविता येते. हाच असतो जादूगाराचा खेळ. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर मोहीनी टाकायची आणि आपल्या हाताची चलाखी  दाखविण्यास सुरूवात करायची. या कलेत जादुगार जेव्हढा प3तिभावंत तेव्हझी जादू करामत करते. मुळ भारतखंडवासियांवर ब्राम्हण प्रवृत्तीच्या या जादुगारांनीही  अशाच प्रकारची मोहिनी टाकून हिंदू धर्मावर प्रभुसत्ता स्थापन करण्याची जादू यशस्वी केली त्या जादूचा प्रभाव आजही कायम असल्याने अगदी सुरूवातीला  उपस्थित केलेले प्रश्‍न अधिक तिव्र होतात.
हिंदू आणि ब्राम्हण... शब्द इतके एकजीव झाले आहेत की त्यांचे वेगळे अस्तित्व मान्य करायला हजारो वर्ष गुलामगिरीत पिचलेल्या बहुजन समाजातील आजची  शिक्षित पिढीही तयार होत नाही. हिंदू आणि ब्राम्हण वेगळे आहेत. बहुजनांच्या हिंदू धर्माशी ब्राम्हणांचा तिळमात्रही संबंध नाही. उल्लेखापुरताही हा संबंध जोडला  जाऊ नये असे कुणी सांगायला गेले तर तो सांगणारा धर्मद्रोही, देवद्रोही आणि ब्राम्हणद्रोही म्हणून गोहत्येच्या पापाचा मालक होतो. ही सारी चालाखी आहे आणि  ब्राम्हण नावाच्या जादुगारानेच बहुजनांच्या मनावर हे बिंबवले आहे आणि म्हणूनच या जादुच्या प्रभावाखाली असलेले बहुजन ब्राम्हणांना आजही हिंदू मानून  मानसिक गुलामीच्या बाहेर यायला राजी होत नाहीत. अशी मानसिक गुलामी पत्करलेल्या बहुजनांच्या असंतोषाला धुनी देण्याचे काम पुन्हा ब्राम्हणच करत आहेत.
ब्राम्हण आणि हिंदू बहुजन हे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. ब्राम्हण हे हिंदू बहुजनांचे उपाध्याय असले तरी देखील ब्राम्हण हिंदू  नाहीत हे सत्य कटू म्हणून स्वाकारावेच लागेल. भारतीय खंडभूमीवर पाऊल ठेवलेले परकीय ब्राम्हण, त्यांच्या संसर्गाने निर्माण झालेले नवब्राम्हण यांच्यात  असलेला सर्वच बाबतीत असलेला फरक आणि या भुमीतील मुळ हिंदू बहुजन यांच्यात दिसणारा सर्वांगी भेद दोन्ही वेगळ्या धर्माचे असल्याचे सिध्द करतो.  चालिरीती, आचारविचार, धर्मविधी, पोशाख या सर्वच आघाड्यांवर ब्राम्हण आणि हिंदू यांच्यात असलेली तफावत आणि त्यातून निर्माण झालेला भेदभाव पुढे  वर्णद्वेषाच्या जन्मास कारणीभूत ठरला. बुध्दीचातुर्याने ब्राम्हणी प्रवृत्तीने बहुजनांवर प्रभुसत्ता स्थापन करून धर्मोपाध्याय हे धर्मातील सर्वोच्च स्थान बळजबरीने घेतले.  धार्मिक बाबतीत ब्राम्हणांइतके अधिकार हिंदू धर्मातील अन्य वर्णजातींना नाहीत हा स्वयंघोषीत फतवा त्यांनी धर्मावर लादला. ही फक्त आणि फक्त बनवेगिरी,  फसवेगिरी आहे.