पावसाचा दणका ः करंजी येथे वादळामुळे छावण्यांची लागली वाट
करंजी (प्रतिनिधी) । 12 - गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील जनावरांच्या छावण्यांची दैना झाली असून निवारेही भुईसपाट झाले आहेत.
सलग दोन ते चार दिवस दुपारनंतर आलेल्या वादळामुळे या छावण्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांनी जनावरांसाठी उभारलेले तात्पुरते शेड वादळामुळे उद्ध्वस्त झाले. बहुतांश छावण्या शेतात असल्याने पावसामुळे मोठया प्रमाणावर चिखल झालेला आहे. त्यामुळे जनावरांना बसण्यासाठी जागा नाही. डोक्यावरचा निवारा वादळामुळे उडाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. शेतकर्यांना जनावरांची देखभाल करण्यासाठी जागा नाही. घरी चारा पाणी नाही. त्यामुळे छावणीतच कसेबसे हाल सहन करत शेतकरी चारा उपलब्ध होईपर्यंत छावणीत दिवस काढत आहेत.
पाथर्डी तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पावसापेक्षा वादळाने सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले आहे. बाबा साखरे, राजेंद्र साखरे, राजेंद्र अकोलकर, मोहन लोहकरे यांच्या घरावरील पत्रे वादळाने उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. झाड, विजेचे खांब पडल्याने तसेच वादळामुळे करंजी, भोसे येथे संत्रा, मोसंबीच्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या दोन दिवसामध्ये पावसाने अनेक ठिकाणी वाताहात केली असुन पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शहरात पावसाने घरांची नुकसान झाले असुन अनेक ठिकाणी वृक्ष पडली असल्याचे दिसुन येते.