दारूबंदीसाठी महिलांचे हजारेंकडे साकडे
पारनेर (प्रतिनिधी) । 12 - तालुक्यातील ढवळपुरी येथील महिलांनी एकत्र येवून दारूबंदीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घातले असून, अण्णांनीही याबाबत सदर महिलांना दारूबंदी साठी मार्गदर्शन केले आहे.
ढवळपुरी येथील सुरेश भालेराव यांच्या नेतृवाखाली वैशाली भालेराव यांनी जागृती दारूबंदी महिला मंडळाची स्थापना करून, ढवळपुरी येथे दारूबंदीसाठी प्रयत्न सुरु केले. गुरुवारी सदर महिलांनी पारनेर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिस अधिकार्यांना दारूबंदीसाठी निवेदन दिले. त्यानंतर राळेगण सिध्दी येथे जावून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेवून ढवळपुरीत दारूबंदीसाठीची माहिती दिली.
यावेळी अण्णा हजारे यांनी महिला संघटित होवून दारूबंदी साठी लढा उभारत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे सांगत, अहिंसेच्या मार्गाने हा लढा सुरु ठेवण्याचे सांगितले. या महिला मंडळात शालूबाई पांडे, शुभांगी आदमने, इंदुबाई भिडे, संगीता साळवे व केसरबाई चितळकर व आदींचा सहभाग होता.
तालुक्यातील ढवळपुरीतील महिलांनी एकत्र येवून दारुबंदीसाठी पर्याय सुरु केले असल्याने तसेच पोलिसांना निवेदन दिल्याने अवैध्य धंदे करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणने आहेत.