Breaking News

बुलडाणा जि.प.अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर

बुलडाणा (प्रतिनिधी)  दि. 11 - बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून जि.प.अध्यक्षपद ओबीसी महिलासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागून होते. महिला आरक्षीत झाल्यामुळे कही खुशी कहि गम अशी अवस्था आहे.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) करीता जाहीर झाले आहे. मिनी मंत्रालय म्हणून ख्याती असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2017 मध्ये होणार असून त्या पार्श्‍वभुमिवर आज 10 जुन रोजी दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथी गृहावर अध्यक्ष पदाची सोडत जाहीर करण्यात आली असून नगर पालिका व महानगर पालिका अध्यक्ष पदाचे आरक्षण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.