डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक
मुंबई, दि. 11 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने काल रात्री उशिरा सनातन संस्थेशी संबंधित विरेंद्र तावडे याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक केली. दाभोलकर हत्ये प्रकरणी ही पहिली अटक असून, अडीच वर्षांनंतर एकाला अटक करण्यात सीबीआयला यश आले. तो हिंदू जनजागृतीशी संबंधित असल्याचेही समजते.
काही दिवसांपूर्वीच सीबीआयने पनवेल येथे छापा टाकला होता. चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे विरेंद्र तावडे अडचणीत आला होता. अखेर चौकशीनंतर त्याला सीबीआय पथकाने अटक केली. तत्पूर्वी छाप्यादरम्यान तावडेच्या घरातून बरेच कागदपत्रे सापडली होती. ती हस्तगत करून चाचपणी सुरू केली होती. या कागदपत्रात त्यांना काही भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेलही मिळाले. एवढेच नव्हे, तर विरेंद्र तावडेचे सनातन संस्थेशी घनिष्ट संबंध असल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्या भोवती फिरत होती. त्यामुळे चौकशीनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात काही गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.