जिल्हा बदली प्रकरणे मार्गी लावणार- दिपा मुधोळ
बुलडाणा, दि. 11 - शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून रोष्टरनुसार रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करुन सेवा ज्येष्ठता यादी ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी दिली. 8 जून रोजी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मुख्य का.अ.यांना आंतरजिल्हा बदलीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना मुधोळ यांनी ही माहिती दिली.
शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यासंदर्शत पाठपुरावा केला. त्यान्वये आजपर्यंत बरीचशी माहिती शिक्षण विभागाने अद्यायावत केली आहे. तसेच 2010 पासून येणा-या शिक्षकांच्या फाईली, त्यांची सेवाज्येष्ठ यादी प्रसिध्द केली आहे. त्यातील त्रुट्या दुरुस्त करुन लवकरच नवीन 30 एप्रिल 2016 पर्यंतची यादी प्रसिध्द होणार, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
सदर प्रसंगी जि.प.विरोधी पक्षनेता अशोक इंगळे, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष वाघ, शिक्षकसेना सचिव गवते, शिक्षक सहकार संघटना जिल्हाध्यक्ष राजू वानखेडे व इतर संतोष इंगळे, समाधान काळुसे, श्रीकांत कायंदे, संदीप नागरे, किशोर भागवत, दिपक श्रीनाथ, संतोष ठाकरे, गजानन लहाने, लोद, सतिष चव्हाण, गोपाल सुलताने, नागरे, सचिन चव्हाण, सतिष मोरे, भास्कर मुरकुट, राहुल पाटील, सुर्यकांत कांगणे, आनंद वैराळकर, मुकुंदा पाटील, आशिष घोती व अमोल शेवाळे इत्यादी उपस्थित होते.