बॉम्बे नर्सिगच्या नोंदणीतून बाह्यरुग्ण विभागास वगळा
। निमा संघटनेच्यावतीने मनपा आरोग्य अधिकार्यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)। 24 - बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी क्लिनीक) चालविणार्या वैद्यकिय व्यावसायिकांना बॉम्बे नर्सिंग होम नोंदणीतून वगळून, महापालिका आरोग्य विभागाच्या व्यावसायिक नोंदणीमध्ये वर्ग करण्याची मागणी निमा संघटनेच्यावतीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्याकडे निवेदनाद्वरे करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश मोरे, सचिव चंद्रकांत केवळ, डॉ. सुनिल बोठे, डॉ.रमाकांत मडकर उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात बाह्यरुग्ण विभाग चालविणार्या डॉक्टरांना दरवर्षी बॉम्बे नर्सिंग होम अँक्टनुसार नोंदणी व नुतणीकरण करावे लागते. यामध्ये अँलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, युनानी हे सर्व येतात. नोंदणीसाठी दिवसेंदिवस अनेक अनावश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असल्याने व शुल्कही वाढल्याने वैद्यकिय व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी उत्पन्न असणार्या वैद्यकिय व्यावसायिकांना बॉम्बे नर्सिंग ऐवजी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्यावसायिक नोंदणीमध्ये वर्ग केल्यास त्यांना नोंदणी करणे व शुल्क भरणो सोयीचे होणार आहे. तसेच या पध्दतीने जिल्ह्यातील नगरपालिकांमध्येही कार्यवाही केल्यास बाह्यरुग्ण विभाग चालवणार्या डॉक्टरांना व्यवसाय करणो सुलभ होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त दिलीप गावडे व आ.संग्राम जगताप यांनाही देण्यात आले आहे
