शरद पवारांंचे विचार तळागाळात पोहचवा ः कळमकर
अहमदनगर, दि. 12- गेल्या 17 वर्षांच्या कालावधीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात व राज्याबाहेरही पक्षाची गौरवशाली वाटचाल राहिली आहे.
आज आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेबाहेर आहोत. अशावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवावीत, असे आवाहन करत स्थापनादिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार करावा, असे प्रतिपादन माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 17 व्या स्थापनादिनानिमित्त नगर येथील राष्ट्रवादी भवनात कळमकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ. संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, प्रदेश सरचिटणीस तुकाराम दरेकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी लोंढे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सभापती शरद नवले, राजेंद्र फाळके, निर्मला मालपाणी, शौकत जहागिरदार, अमृता कोळपकर, सोमनाथ धूत, राजश्री मांढरे, वैभव ढाकणे आदी उपस्थित होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या डॉ. नवनाथ गव्हाणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.