पाणी साचविणे ही काळाची गरज ः अनिल कोठारी
अहमदनगर, दि. 12 - पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे, पाणी हे जीवन आहे. मनुष्याला जगण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने पाणी साचविले पाहिजे. पाणी हा पर्यावरणाचा अनमोल घटक आहे प्रत्येकाने आपल्या कुटूंबाला व समाजाला पाणी बचतीचा संदेश दिला पाहिजे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती होय.पाणी वाचविले तरच पाणी साचणार आहे म्हणून पाणी साचविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे संचालक अनिल कोठारी यांनी केले.
नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या पाणी साचवा... पाणी वाचवा.. या जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणसमारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष व नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मु
नोत, सेक्रेटरी सत्येन मुथा, मनोज गुंदेचा, शरद मुथा, प्रमोद डागा, संतोष कासवा, राहुल सावदेकर, योगेश मुनोत आदि उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम - पूजा राजू कापसे (बाराबाभळी), द्वितीय - आशा पोपटलालजी भंडारी
(नगर), तृतीय - किर्ती सुभाष डहाळे (केडगांव), उत्तेजनार्थ - रेश्मा अनिल तोरफड (कर्जत), बागवान शेख मिराबक्ष
खुदाबक्ष (वडाळा महादेव). स्पर्धेचे परिक्षण सौ.मालती माधव गोरे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. प्रास्तविकात मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी सांगितले की, मंडळाच्यावतीने नेहमीच जनजागृती करण्यासाठी वर्षभर विविध विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करते.
पाणी वाचवा, पाणी साचवा या निबंध स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 50हून अधिक निबंध आले. प्रत्येक स्पर्धकाने निबंधात पावसाळ्यात पाण्याचा थेंब न् थेंब वाया जावू न देता त्याची साठवण करणे. शेतीवर, तळ्यात, गावातील बंधारे, ओढे, नाले आडवून पाणी आडवा-पाणी जिरवा चा संदेश दिला आहे. सर्वांचे स्वागत मंडळाचे सेक्रेटरी सत्येन मुथा यांनी केले तर माजी सेक्रेटरी मनोज गुंदेचा यांनी आभार मानले.