Breaking News

लायन्स क्लबच्या वतीने लेकीस शिलाई मशीन भेट

अहमदनगर, दि. 12 - आर्थिक बिकट परस्थितीवर मात करुन कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्यासाठी माय-लेकीच्या चालू असलेल्या धडपडीला मदतीचा हात म्हणून लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियमच्या वतीने शिलाई मशीन भेट देण्यात आली.
कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकिची असताना इतरांपुढे हात न पसरता सारिका जोशी स्वयंपाकाचे काम करत आहे. त्यांची कन्या कु.गायत्री जोशीने नुकतेच शिवण क्लासचे प्रशिक्षण पुर्ण करुन, ती शिवणकामाद्वारे आईला मदत करत आहे. या माय-लेकीच्या जिद्दीचे वास्तव पाहून सामाजिक कार्य करणारे लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियमच्या वतीने गायत्री जोशीला शिलाई मशीन भेट देण्यात आली. यावेळी क्लबचे अध्यक्ष निलेश संकलेचा, सचिव संजय आडेप, खजिनदार हरिश हरवानी, सौ.अपेक्षा संकलेचा, सौ.शर्मिला पाटील, महेश पाटील आदि उपस्थित होते.