Breaking News

शिवस्मारकास विरोध करणार्‍यांच्या पाठीशी कोण

अहमदनगर, दि. 10 - गेल्या अनेक वर्षापासुन शिवस्मारकाच प्रश्‍न भिजत पडला आहे. सत्ता आल्यानंतर सर्वांनीच या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. शिवस्मारकासाठी महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे. मात्र, काही तथाकथित मंडळींनी समुद्रामधे पुतळा उभा राहिल्यास प्रदूषण होऊ शकत, असे मत व्यक्त केले आहे, शिवस्मारकाला विरोधक करणार्‍यांच्या पाठीशी कोण असा सवाल अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांनी केला आहे.
अखिल भारतीय युवक मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष गौतम (भैय्या ) म्हस्के यांनी शेवगाव येथे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाथर्डी तालुकाध्यक्ष नामदेव काकडे होते. डॉ.टकले म्हणाले, ज्या शिवरायांनी देश घडविला, त्या शिवरायांचा पुतळा अरबी समुद्रात उभा राहिल्यास मराठ्यांचा इतिहास जगासमोर येईल, ही भीती निर्माण झाल्यामुळे ही तथाकथित मंडळी वेगळे वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा प्रर्यंकरीत आहेत.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, इतर समाजाचा आदर्श घेत मराठ्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोपान मोटकर, अनिल म्हस्के, अनिल टेकाळे श्रीकांत औटी, स्वप्नील टकले, बप्पासाहेब काटे उपस्थित होते.