बिंदुनामावली तयार करण्याचे श्रेय शिक्षण विभागास
बुलडाणा, दि. 11 - कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद शिक्षण विभागाची बिंदुनामावली अखेर पुर्णत्वास गेली आहे. बिंदुनामावलीमध्ये विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठा/उर्दू, सहाय्यक अध्यापक मराठी/उर्दू, इ.5 ते 12 मुख्याध्यापक माध्यमिक मराठी/उर्दू, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक इ. 11 व 12 मराठी सदर संवर्गाचे बिंदु नामावलीचे काम पूर्ण झाले आहे. बिंदुनामावली मुळे पुर्णत्वास गेलेली कामे-उच्च श्रेणी पदोन्नती, अतिरिक्त मुख्याध्यापक व शिक्षक समायोजन, विनंती व आपसी बदल्या, राज्य स्तरावरुन केंद्र प्रमुख भरतीचा मार्ग मोकळा झाला असून विस्तार अधिकारी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय विभागात सुसूत्रता आली आहे. यामुळे शिक्षण सेनेतर्फे जिल्हा परिषद प्रशासनातील अधिका-यांचा सत्कार 6 जून रोजी करण्यात आला.
बिंदुनामावली कार्यपध्दती- सर्वप्रथम ओमप्रकाश देशमुख, तत्कालीन मु.का.अ. यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली भगवान ठग, शिक्षणाधिकारीप्राथ. व मदन आंधळे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी बिंदुनामावली कक्ष स्थापन करुन यामध्ये शिक्षण विभागात शे. जाबीर वरीष्ठ सहाय्यक सुधीर तोमर कनिष्ठ सहाय्यक, गजानन पवार शिक्षक, नारायण ताठे शिक्षक यांचा समावेश केला. सदर कक्षाने सर्व शिक्षकांचे प्रथम नियुक्ती आदेश, पदोन्नती आदेश, जात वैधता प्रमाणपत्र, न्यायालयीन प्रकरणे यांची काटेकोरपणे तपासणी करुन संवर्गनिहाय यादया प्रकाशित केल्या तसेच संपुर्ण कागदपत्रांची व्यवस्थित फायलिंग केली. बिंदुनामावली तयार करतांना वेळोवेळी येणा-या अडचणींवर विभागीय बिंदुनामावली मागासवर्ग कक्षाने वेळोवेळी मार्गदर्शन केले. यामध्ये उपायुक्त अपाले व संजय मुरतकर, अव्वल कारकून यांनी त्रुटी पूर्तता करुन घेतली.
वरील अवघड कार्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचा व बिंदुनामावली टिमचा सत्कार शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आला. याशिवाय जिल्हा प्रशासनातील दिपा मुधोळ मुकाअ., पाडुरंगदादा खेडेकर शिक्षण सभापती, राजेश लोखंडे उप मुकाअ. व बिंदुनामावली टिम उपस्थित होती. सदर कार्यक्रम जि.प.सि.ई.ओ. दिपा मुधोळ यांच्या दालनात पार पडला. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि वाघ, जिल्हा सरचिटणीस सुनिल गवते, जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद पवार, कार्याध्यक्ष अमोल पाटील, कोषाध्यक्ष गजानन गाढे हे उपस्थित होते.