केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांच्या अस्तित्त्वावर येणार गदा ?
नवी दिल्ली, दि. 11 - वन्य प्राण्यांच्या अस्तित्त्वावर केंद्रीय जलसंपदा मंत्रालयातर्फे राबवण्यात येणारा केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे गदा येणार असल्याची शक्यता पर्यावरणवाद्यांकडून वर्तवण्यात येत असून मानव आणि प्राणी असा संघर्ष केंद्रीय जल मंत्रालयातर्फे राबवण्यात येणारा महत्वाकांक्षी असा केन-बेटवा नदीजोड प्रकल्प हा पेटवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त पाणी मध्यप्रदेशमार्फत दुष्काळग्रस्त अशा बुंदेलखंडात वळवणार आहे.
त्यासाठी दौधन धरण आणि अडीच किलोमीटरचा कालवा बांधण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील केन नदीपात्रातील अतीरिक्त पाणी मध्य प्रदेशच्या बेटवा नदीत सोडण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर दुष्काळाने होरपळणा-या बुंदेलखंडातील 7 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणे सहजसाध्य होणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील वाघांसाठी राखीव पन्ना अभयारण्यातील वन्य प्राण्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
2009 सालापासून पन्ना अभयारण्यातील वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत असून गिधाडांसारख्या दुर्मिळ पक्षांचे प्रमाणही या परिसरात लक्षणीय आहे. या नदीजोड प्रकल्पानंतरचा मानवी हस्तक्षेप या वन्य जीवांच्या मुळावर उठण्याची शक्यता असून एकीकडे मानवाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याच्या नादात आपण वन्य जीवांच्या अस्तित्व असणारा भूभागही गिळंकृत करतो आहोत, अशा शब्दांत पर्यावरणप्रेमी खंत व्यक्त करत आहेत.दरम्यान सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी वन विभागाची काही जमीन, सिमावर्ती भागात वसलेल्या लोकवस्त्या उठवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले आहे. केंद्रीय पर्यावरण, केंद्रीय वन आणि प्रकल्पासंबंधित सर्व खात्यांची मंजुरी घेतली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडूनही या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात आलेली असून ही समितीही लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.