विरोधकांची डोकेदुखी सोनिया-मनेकांच्या जवळीकीने वाढली
लखनऊ, दि. 11 - गांधी-नेहरु परिवारातील सोनिया आणि मेनका या दोन सुनातून विस्तव जात नव्हता. मात्र आता याच दोन सुना एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत असून त्यामुळे उत्तर प्रदेशातील विधानसभेची गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेसकडे या निवडणुकीत योग्य उमेदवार नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची इच्छा असूनही भाजपने वरुन गांधींना मोठी जबाबदारी दिली नाही. यासह भाजपने मेनका गांधीनाही पक्षात पाहीजे तेवढा भाव न दिल्याने त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत गांधी परिवार एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे रणनितीतज्ञ प्रशांत किशोर याबाबत पुढाकार घेत असल्याचे बोलले जात आहे.
अगोदरच प्रियंका आणि वरुन गांधी यांच्यात चांगले बोलणे आहे. तर दुसरीकडे मेनका गांधीनीही सोनियांची अनेक वेळा स्तुती केल्यामुळे गांधी परिवार उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.