Breaking News

आगरकरांच्या इशार्‍याने राजकीय खळबळ

। शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ पातळीवरुन उमेदवार निश्‍चित होण्याची शक्यता  । भाजपामधील गटबाजी उफाळली

अहमदनगर, दि. 11 - भारतीय जनता पार्टीला गृहीत धरु नका असा इशारा अ‍ॅड.अभय आगरकर यांनी महापौर निवडणुकीच्या तोंडावर दिल्याने  राजकीय भुकंपच मनपा निवडणुकीत झाला असल्याचे चित्र आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर टिका करताना म्हंटले आहे की, ‘निजामाच्या बापाचे राज्य’ यावरुन भाजपचे
नेते चांगलेच खवळले असून जिल्हयात सेनेला कोंंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे अगरकर यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे. भाजपाला गृहीत धरु नका असे अ‍ॅड. आगरकर म्हणाल्याने राजकीय भुकंपच झाला असल्याचे चित्र आहे.
21 जुन रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक होत आहे. या पार्श्‍वभुमीवर शिवसेनेचा महापौर तर भाजपाच उपमहापौर अशी बांधणी सुरु आहे. शिवसेनेचा उमेदवार जवळजवळ निश्‍चित झाला असता तरी भाजपाचा संभाव्य उमेदवार म्हणून खासदार पुत्राचे नांव घेतले जात आहे. परंतु आगरकर यांचा खासदार पुत्राला विरोध असल्याचे दिसते. यातुन पुन्हा एकदा भाजपची गटबाजी उफाळुन आली असल्याचे दिसत आहे. भाजपामध्ये सध्यातरी  उपमहापौरपदासाठी खासदार पुत्र आणि उपनगरमधील महिला मनिषा बारस्कर सोडुन इतर नावाची चर्चा नव्हती परंतु गुुरुवारी अ‍ॅड.अगकर यांनी शिवसेनेने भाजपला गृहीत धरु नये असे वक्तव्य केल्याने राजकीय भुकंपच झाला आहे. यातुन महाराष्ट्रातील वाद आता जिल्हयात येवून ठेपल्याचे चित्र समोर दिसत आहे.
अ‍ॅड.अगरकर म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्तेची एकीकडे चव चाखायची आणि दुसरीकडे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर टिका करायची हे आता खपवुन घेतले जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांना देशातच  नव्हे तर देशाबाहेरली मोठा मान मिळत आहे. हा भारताचा बहुमान आहे. असे असताना देखेली भारतीय जनता पार्टी कोणही केलेले आरोप सहन करणार नाही. तर त्यांना चोख प्रतिउत्तर देईल असा इशारा अगरकर यांनी दिल्याने राजकीय भुकंप झाल असल्याचे वातावरण सध्या शहरात निर्माण झाले आहे. या भुकंपाचा परिणाम निश्‍चितच या महिन्यात होणार्‍या  महापौर निवडीवर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.