Breaking News

नियमित योग साधनेने सुखी-समृद्धी जीवन जगता येते

। स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ व योग विद्या धाम तर्फे योग शिबीर सुरु

अहमदनगर दि. 11 - 21 जून 2016 रोजी दुसर्‍या जागतिक योग दिनानिमित्त स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ व योग विद्या धाम यांच्यावतीने 21 दिवसीय योग शिबीर वर्गाचा शुभारंभ नुकताच बागडपट्टी येथील समाजाच्या सांस्कृतिक कार्यालयात करण्यात आला. नगरसेविका मालनताई ढोणे यांच्या हस्ते श्री.जिव्हेश्‍वर भगवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने या वर्गाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी माणिक अडाणे, जयंत वेसिकर, बाबासाहेब वैद्य, कृष्णा बागडे, संदिप मुळे, प्रमोद डोळसे, संजय सागांवकर, राजन कुमार, सुधाकर आडसूळ, योग तज्ञ शिक्षिका डॉ.शिल्पा ढोणे, सहशिक्षिका सौ.सातपुते व नडीमेटलाताई याप्रसंगी उपस्थित होते. या शिबीरात 100 युवक-युवती, महिला व पुरुष यांचा सहभाग आहे. सकाळी 6 ते 7  यावेळेत हा वर्ग बागडपट्टी येथील सामाजाच्या सांस्कृतिक सभागृहात सुरु आहे.
माणिक अडाणे यांनी याप्रसंगी योगाचे महत्व सांगताना योगाभ्यास ही भारताने संपूर्ण जगास दिलेली देणगी असून, मागील वर्षापासून 194 देशांनी या दिवसास मान्यता दिली असून, 21 जून रोजी 177 देशामध्ये हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. रोज योगा केल्याने शरीराबरोबर मनुष्याच्या मनावर चांगला परिणाम होतो. मन स्थिर व शांत राहतो. आपुलकी, आस्था, प्रेम, जिव्हाळा वाढतो. सातत्याने योगा केल्यास ताण तणावही कमी होतो. शेवटी शिल्पा ढोणे यांनी आभार मानले. 21 जून रोजी जागतिक योगा दिन असल्याने गुलमोहोर रस्त्यावरील आनंद प्रशालेय सामुहिक योग व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन योग विद्या धामच्यावतीने करण्यात आले आहे.