एसआयटी करणार ‘ऑगस्टा’ व माल्ल्या प्रकरणाची चौकशी
नवी दिल्ली, दि. 10 - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील लाचखोरीचा आणि उद्योगपती विजय माल्ल्या यांच्याशी संबंधित पैशांची अफरातफर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. इटलीतील तपास पथकाकडून ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयच्या पथकाने प्राथमिक तपास केला आहे. या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या व्यवहाराला तत्कालिन संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी स्थगिती दिली होती. या आधी ईडीने ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारात दिल्लीतील उद्योजकाच्या निवासस्थानी छापे मारण्यात आले होते.
हा उद्योजक एक ब्रिटिश नागरिक आहे आणि 3600 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहारात संशयित मध्यस्थ ख्रिश्चेन मिशेलच्या तो संपर्कात होता. अधिका-याने सांगितले की, तपास संस्थेच्या पथकाने दक्षिण दिल्लीतील उद्योजकाच्या घराची झाडाझडती घेतली तसेच या उद्योजकास चौ
कशीसाठी ईडीने हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले होते मात्र या उद्योजकाने समन्सचा आदेश पाळला नाही.
त्याच्या घरावरील छाप्यात काही महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि कॉम्प्युटर हार्डवेअर जप्त केले आहे. ऑगस्टा वेस्टलँडचे प्रकरण समोर आल्यानंतर संसदेत या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला होता त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.विजय माल्ल्या याच्या विरोधात एकाहून अधिक आरोपपत्र दाखल करण्याचे सीबीआयने ठरविले आहे. आयडीबीआय बँकेचे 900 कोटींचे कर्ज माल्ल्या यांनी बुडविले असून त्याची चौकशी सीबीआय करीत आहे. त्याच बरोबर या बँकेसहित इतर बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज थकविल्याच्या प्रकरणात माल्ल्या यांची सक्तवसुली संचालनालयाकडूनही चौकशी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानसार माल्ल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.