Breaking News

दिल्ली वारीतही खडसेंच्या पदरी निराशा

नवी दिल्ली, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच विदेश दौ-यावरून मायदेशी परतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन  खडसे आपली बाजू मांडतील. खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना पक्षादेशानुसार नुकताच महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर  प्रथमच ते दिल्ली दरबारी दाखल झाले. पण काल रात्री त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यां
च्या भेटीसाठी थांबणे व्यर्थ  असल्याचे लक्षात आल्यावर नाथाभाऊ मुंबईकडे रवाना झाले.
सत्तेत राहूनही खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ते अगोदरपासूनच वादाच्या भोव-यात अडकलेले असतानाच त्यांच्यावर दाऊदशी कथित फोन संभाषण,  भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरण, पीएची लाचखोरी आदी प्रकारचे आरोप झाले. त्यामुळे खडसे चांगलेच अडचणीत आले. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत  भाजपमध्ये भ्रष्टाचार झाला नाही, असा दावा करणा-या पंतप्रधान मोदींनाच खडसे यांच्या राजीनाम्यासाठी आदेश द्यावे लागले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दरबारी बोलावून घेऊन खडसे यांच्याबाबतचा अहवाल मागविला आणि त्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगितले.  त्यामुळे त्यांनी शनिवारीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत  चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.