Breaking News

छोटा राजनचा गेम करण्याचा प्लान फेल

नवी दिल्ली, दि. 10 -  दाऊदचा तिहार तुरूंगात असलेला डॉन छोटा राजन याची तुरुंगात हत्या करून काटा काढण्याचा प्लान फेल गेला आहे. दाऊदचा खास  छोटा शकील याने राजनचा काटा काढण्यासाठी चार जणांना सुपारी दिल्याचा खुलासा नुकताच झाला असून या चार जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातून दाऊदचा कट्टर दुश्मन छोटा राजन याला अटक करण्यात आली असून त्याला शिक्षा भोगण्यासाठी तिहार तुरुंगात  धाडण्यात आले आहे. राजन याची हत्या करण्याचा प्लान दाऊदने अनेकदा केला पण प्रत्येकवेळी राजन हा त्यातून सुखरूप वाचला आहे. यावेळी तुरुंगातच  त्याला मारण्याचा प्लान दाऊदने पुन्हा केला. त्यासाठी छोटा शकीलने चार ज
णांना सुपारी दिली. दरम्यान, तुरुंगातील लॅन्डलाईन फोनवर छोटा राजन याला ठार  मारू अशा धमक्याही येत होत्या.
या चारही संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. हे चारही जण इंटरनेट आणि फोनच्या माध्यमातून शकीलच्या संपर्कात होते. हे चौघेही दिल्ली व आसपासच्या  परिसरात राहणारे असून त्यांच्याकडून 9 एमएमच्या बंदुका व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मुंबईहून राजनला त्याचा ड्रायव्हर भेटण्यासाठी येणार होता,  आधी त्याला ठार करुन नंतर राजनला ठार करण्याचा त्यांचा प्लान होता. पण हा प्लान फसला आहे. या चारही आरोपींचे संभाषण पोलिसांनी टॅप करुन त्यांना  अटक केली. छोटा राजनला जेलमध्ये घुसून किंवा त्याला जेव्हा न्यायालयात हजर केले जाते, त्यावेळी संधी साधून ‘गेम’ करण्याचा कट या चौघांचा आणि  पर्यायाने दाऊद कंपनीचा होता, असे म्हटले जात आहे.