ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवाल
सिडनी, दि. 11 - आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने चीनच्या वँग यिहानचा 21-8, 21-12 असा सहज पराभव केला. त्यापूर्वी तिने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रॅचनॉक इनतॅनॉन हिचा पाडाव केला. सायनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात सुरवातीपासून हुकमत राखली. खेळातील चढ-उताराने तिला यंदा सतावल्यामुळेच ती खरच ऑलिंपिक पदकाची दावेदार आहे का अशीही टीका सुरू झाली आहे, पण सायनाने निर्दोष खेळ करीत टीकाकारांना उत्तर दिले. तिने अंतिम फेरीत धडक मारल्याने ऑलिंपिकपूर्वी तिची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. अंतिम फेरीत सायनाची चीनच्याच सन यू हिच्याशी लढत होणार आहे.