सानियाच्या पसंतीनंतरच बार्शीच्या प्रार्थनाची रिओमध्ये वर्णी
सोलापूर, दि. 11 - भारताची नंबर एक टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या पसंतीनंतरच सोलापूरच्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा असल्याचे सानिया मिर्झाने अखिल भारतीय टेनिस संघटनेला कळवले होते. तर तिने मिश्र दुहेरीसाठी रोहन बोपण्णाला पसंती दिली होती. सानियाच्या पसंतीनुसारच आयटाच्या निवड समितीने मिश्र दुहेरीसाठी सानिया आणि बोपण्णा तर महिला दुहेरीसाठी सानिया आणि प्रार्थना ठोंबरे असा संघ निवडला आहे. 21 वर्षीय प्रार्थनाने आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपद मिळवली आहेत. 2014साली इन्चिऑन येथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनाने सानियाच्या साथीने कांस्यपदक मिळवले होते.