आयएनएस विक्रमादित्यवर वायू गळती
वास्को, दि. 11 - देशातील सर्वात शक्तीशाली आणि भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या अण्वस्त्रवाहू जहाजावर वायू गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत जहाजावरील दोघा कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी विक्रमादित्य जहाजाचा कायम तळ असलेल्या कारवारच्या सी बर्ड तळावर ही घटना घडली. मृत्यू आलेल्यांमध्ये एक नौदल खलाशी तर दुसरा नागरी कर्मचारी असून त्यांची नावे राकेश कुमार व मोहनदास कोळमकर अशी आहेत. कारवारच्या नौदल इस्पितळामध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास आयएनएस विक्रमादित्य या जहाजावर चाललेल्या दुरूस्ती कामाच्या दरम्यान ही घटना घडली. विषारी वायुची गळती दुरूस्तीकाम चाललेले असताना झाली. हा विषारी वायु राकेश कुमार, मोहनदास कोळमकर तसेच अन्य दोघांच्या नाकातोंडात शिरल्याने ते बेशुध्द पडले. यात राकेश कुमार हा जहाजावरील नौदलाचा खलाशी तसेच मे. रॉयल मरिन या एका खासगी कंपनीचा कर्मचारी या दोघांना घटनास्थळीच मृत्यू आला. अन्य दोघांना कारवारच्या नौदल इस्पितळात दाखल करण्यात आले. त्या दोघा जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.