बगदादमध्ये बॉम्बस्फोट; 22 ठार
बगदाद, दि. 09 - आज इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरामधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 22 पेक्षा जास्त ठार झाले आहेत; तर 70 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेच्या सैन्यास बगदादच्या पश्चिमेस असलेल्या फलुजा शहरामधून हुसकावून लावण्याच्या प्रयत्नांमध्ये इराकी सैन्य
असतानाच घडविण्यात आलेले हे स्फोट अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहेत.
बगदादमधील आर्थिक व्यवहाराचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण असलेला ‘बगदाद अल-जदीदा‘ येथे घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये किमान 15 मृत्युमुखी; तर सुमारे 50 जखमी झाले. याचबरोबर, बगदादच्या उत्तरेस असलेल्या ताजी येथील इराकी सैन्याच्या ‘चेकपॉईंट’जवळ घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये सात सैनिक ठार झाले. हे दोन्ही स्फोट स्फोटकाने भरलेले वाहन चालविणार्या आत्मघातकी दहशतवाद्यांकरवी घडविण्यात आले. इसिस व इराकी सैन्यामधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक रक्तरंजित होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.