पर्यावरण रक्षणासाठी दूत बना ः एस.पी.त्रिपाठी
अहमदनगर, दि. 12 - जीवसृष्टी हि निसर्गाकडून मानवाला मिळालेली देणगी असून तीचे संवर्धन व संरक्षण करणे हि प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी केले. लार्सन अॅण्ड टुब्रो लि.अ.नगर व इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या इएसइ सभागृहात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव प्रास्ताविक व स्वागत करुन कार्यक्रमाच्या आयोजना मागील हेतू विषद केला.
या कार्यक्रमांच्या प्रसंगी एल.अॅण्ड टी. कंपनीचे जॉ.जनरल मॅनेजर अरविंद पारगांवकर, मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव, इन्स्टीट्युटचे सचिव एच.आर.थिगळे, प्रकाश गांधी, अविनाश मांडे, महेश चांडक तसेच कंपनीचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैसर्गिक संपत्तीच्या अति-शोषणाचे दुष्परीणाम मानवाला बदलते हवामान, अनियमित ऋतुचक्र, ग्लोबल वार्मिंग, ग्रिनहाऊस इफेक्ट व्दारे भोगावे लागत असून अशीच परिस्थिती या पुढे राहिल्यास मानवी जीवन नामषेश होणयास वेळ लागणार नाही अशा इशारा त्यांनी यावेळी दिला. पर्यावरण संरक्षण ही भारताची संस्कृति असून आपल्याला ऋषिमुनीकडून मिळालेली हि शिकवण आहे. यासाठी वन्यजीवांचा व वनसंपत्तीचा र्हास टाळण्यासाठी मानवाने उपभोगी वृत्तींचा त्याग केला. तरच भविष्यात आपले जीवन सुखकर होईल. ते पुढे म्हणाले अनेक वर्षापासून पर्यावरण विषयीवर विविध पातळ्यांवर नुसतेच चर्चा होते. किरकोळ प्रयत्न होतात. परंतु आजपर्यंत या क्षेत्रात निराशदायी अशीच परिस्थिती दिसते. पर्यावरणाचे प्रश्न दिवसें दिवस गंभीर होत चालले असून या विषयी आसलेल्या कायद्यांचा क्वचितच वापर केला जातो. या विषयावर जास्त न बोललेच बरे!
अरविंद पारगांवकर यांनी औद्यागिक विकास हा पर्यावरणास घातक ठरत असून त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. विकासच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. ही पर्यावरणास घातक बाब असून यावर तातडीने उपया योजना करण्याची गरज आहे. एल.अॅण्ड टी.कंपनी स्थापनेपासून पर्यावरण क्षेत्रात अतिशय भरीव असे कार्य कृतितुन करत असून यंदाच्या वर्षी कंपनीने शहर व कंपनीच्या आवारात 5 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. इस्टीट्युटचे सचिव हरीचंद्र थिगळे यांनी ‘वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार’ या संकल्पनेवर आपले मत मांडले. व इस्टीट्युटच्या वतीने सुर असलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. ईश्वर हंडे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र भावसार, कैलास गायकवाड, सुखदेव निमसे, दत्तात्रय बोरुडे, संजय टेणी, सुहास देवराईकर आदींनी परिश्रम घेतले. एल.अॅण्ड टी कंपनीच्या आवारात सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.