सोन्याची म्हणून पितळेची नाणी देऊन गंडा घालणारी टोळी गजाआड
महाबळेश्वर, दि. 09 - आम्ही बांधकामावरील बिगारी असून खोदकाम करताना जुनी सोन्या-चांदीची नाणी व दागिने सापडले आहेत, असे सांगत या मौल्यवान वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणार्या तीन चोरट्यांना महाबळेश्वर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या नाण्यांसह पितळेची नाणी व दागिने असा सुमारे 1 लाख 80 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला.
महाबळेश्वरचा येथील उन्हाळी हंगामाचा अंतिम टप्पा सुरू असून पर्यटकांचा ओघ हळूहळू कमी होत चालला आहे. सहलीसाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची पथके शहर व परीसरात रात्रीची गस्त घालत असतात. हवालदार संदिप मांढरे यांच्या नेतृत्वाखाली तुकडीची रात्रगस्त सुरू होती. हे पथक बसस्थानकाच्या मागील हॉटेल ड्रीमलॅण्डच्या प्रवेश द्वारापासून निघाले असता गणवेशात असलेल्या पोलिसांना पाहताच प्रभु गलशन सोळंकी (वय 30, रा. कल्याणनगर आजवा रोड, वडोदरा, गुजरात), नरेश मोहन साकला सलाट (वय 38, रा. बुखेर रोड तलावडी, ता. बायर, जि. अरवली गुजरात) व देवा बाना मारवाडी (वय 39, रा. न्यु काटेंली बाग. सिताराम नगर, बरोडा, गुजरात) हे तिघेजण गेटजवळ असलेल्या एका गाडीमागे लपताना दिसले. त्यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना घेराव घातला. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडून आठ सोन्याची व पाच चांदीची नाणी सापडली.
सोने सदृश पितळेच्या धातुची आयाताकृती नाणी, मन्यांच्या माळा व दागिने तयार करण्यासाठी तार असा एकूण 18 किलो ऐवज पोलिसांनी जप्त केला. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लोणावळा हिंजवडी, कात्रज, मुंबई, गोवा, गुजरात व राजस्थान या राज्यात अशाच पध्दतीने या गंडा घातला असल्याचे उघडकिय आले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार अशोक काशिद, श्रीकांत कांबळे करत आहेत.