कास तलवाच्या उंची वाढविण्यासाठी चाचण्या सुरू
सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) : शहराच्या पश्चिमेस सातारा-बामणोली मार्गावर 23 किलोमीटर अंतरावर कास तलाव आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणार्या कास तलावाची उंची वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक तपासणीसाठी परिसरातील माती, दगडाचे नमुने सॉईल टेस्ट मशीनद्वारे घेण्यास जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग, सातारा यांच्याकडून सुरुवात झाली आहे. हे नमुने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. कास तलावाची उंची वाढविण्याच्या अनुषंगाने या टेस्ट घेतल्या जात आहेत. मात्र, केवळ तपासणी म्हणून आम्ही हे काम हाती घेत
ले असल्याची माहिती जिहे-कटापूर योजनेचे कार्यकारी अभियंता शरद गायकवाड यांनी दिली.
कास तलावानजीक खालील बाजूस माती व दगडाचे नमुने घेण्यासाठी 9 जागा निश्चित केल्या आहेत. सध्या 4 ठिकाणी सॉईल टेस्ट मशीनद्वारे माती व दगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यानंतर उर्वरित 5 ठिकाणच्या दगड-मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. या मशीनद्वारे 120 फूट खोल जाऊन तीन मीटरवर माती, त्या खालोखाल साडेचार मीटरवर जांभा खडक, त्याखाली साडेचार ते 6 फुटावर परत माती असे नमुने प्लास्टिक पिशवीत घेऊन पाटबंधारे विभागाकडे पाठविले जाणार आहेत. काळा खडक लागल्यांनतर त्याखाली 5 मीटरपर्यंतच्या तपासणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत. जिहे-कटापूर धरण विभागामार्फत कास धरण उंची वाढविण्याचे काम केले जाणार आहे.