शिवसेनेची भाजपकडून खिल्ली
मुंबई, दि. 10 - शिवसेना-भाजप यांची राज्यामध्ये आणि देशात सत्ता असली तरी या दोन्ही पक्षांमधील वाद हा काही थांबण्याचे काही चित्र दिसत नाही. दोन्ही पक्षातील नेते कुठल्या ना कुठल्या कारणावरुन एकमेकांवर कुरघोडी करत असतात.
निजामाचे राज्य असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. कारण, भाजपने पोस्टर्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत असतानाचे दिसत आहे. भाजपवर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता सोशल मीडियात काही पोस्टर्स व्हायरल होत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाना साधण्यात आला असून उद्धव ठाकरे यांची तुलना बेडकाशी केली आहे.
तर, देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत त्यासाठी खर्याखुर्या संकटांचा सामना करावा लागतो अशा आशयचेही एक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.

