Breaking News

दहावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. 10 -  नुकताच दहावीचा निकाल लागला असून यात अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर काही विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवण्यात कमी पडले  आहेत. 18 जुलैपासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सुरू होणार असून या फेरपरीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. यावर्षी 9 जुलै ते 16 जुलैमध्ये तोंडी परीक्षा होणार आहेत,  तर 18 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. ुुु.ारहरहीीललेरीव.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या वेबसाईटवर बोर्डाने परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक टाकले आहे.  विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेपुर्वी शाळांमध्ये छापील वेळापत्रकातून परीक्षेची तारीख आणि वेळ याची माहिती करुन घ्यावी असे आवाहन बोर्डाने विद्यार्थ्यांना केले आहे.