Breaking News

अनधिकृत इंग्रजी माध्यमाची शाळा तात्काळ बंद करा ः मागणी

अहमदनगर, दि. 10 - अहमदनगर बॉईज हायस्कुल या माध्यमिक शाळेत बेकायदेशीररित्या स्वयंघोषित विश्‍वस्ताने सुरु केलेली अनधिकृत इंग्रजी माध्यमाची शाळा त्वरीत बंद करावी अशी मागणी करत दि. 6 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणि उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना चंद्रकांत आनंद उजागरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 2004-05 सालासाठी विश्‍वस्त व सेक्रेटरी म्हणुन मुदत होती मात्र आता यांच्या नावाला कुठेही अधिकृत विश्‍वस्त म्हणुन परवानगी दिलेली नाही. त्याबाबत मा.धर्मदायआयुक्त मुंबई यांचे दि.27 सप्टेंबरचे पत्र यावेळी जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले. तसेच 200 वर्ष जुनी ऐतिहासिक शाळा स्वतःच्या स्वार्थासाठी बंद करण्याचा कट रचला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.