दिल्लीकरांच्या आरोग्य विमा योजनेस हिरवा कंदील
नवी दिल्ली, दि. 09 - दिल्लीकरांना खुश करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विमा या योजनेस हिरवा कंदील दाखवला असून हा निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आता दिल्लीकरांना या निर्णयामुळे मेडिकल विमा मिळू शकणार आहे. या आरोग्य विम्यासाठीचे शुल्क तीन टप्प्यात नागरिकांना भरता येईल. नागरिकांना 3 हजारांपेक्षा कमी खर्चात या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकार दारिदयरेषेखालील दिल्लीकरांच्या विम्याच्या हफ्त्याची रक्कम भरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांच्या रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट, आधार कार्ड असणे गरजेचे असल्याचे जैन यांनी सांगितले.