Breaking News

मनसे करणार शेतकरी संघटनेची स्थापना

मुंबई, दि. 11 -  राज्यातील शेतक-यांचा प्रश्‍न सोडविण्यास सरकार अयशस्वी ठरल्यामुळे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली.

मनसेच्या पदाधिका-यांसाठी पनवेलमध्ये दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे शिबीराच्या समारोपाच्या भाषणात बोलत होते. ठाकरे म्हणाले, आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा असून, तो माझ्या कुटुंबाचा नाही. तसेच माझ्या कुटुंबापैकी कोणाचेही छायाचित्र होर्डिंग्जवर लावायचे नाही, अशी सूचना त्यांनी पक्षाच्या अधिका-यांना दिली. तुमच्या मनातील जे काही प्रश्‍न असतील ते लेखी स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.
त्यावेळी माध्यमांशी संपर्क, पक्षाचा धोरण, सरकारबाबत अधिकृत भूमिका, जबाबदाऱया व अन्य कार्यक्रमांची व्यवस्थापन अशा स्वरूपाचे लेखी प्रश्‍न कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आले. भाषणात राज यांनी सर्वांना समर्पक उत्तरही दिले. यावेळी त्यांनी पक्षाच्या होर्डिंग्जवर कुटुंबातील कोणाचेही छायाचित्र लावायचे नाही, अशी सूचना दिले.