सनानतने विरेंद्र तावडेवरील आरोप फेटाळले
नवी मुंबई, दि. 11 - सध्या सनातनच्या निरापराध साधकांना फसविण्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हणत डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या डॉ. विरेंद्र तावडेवर लावलेले सर्व आरोप सनातन संस्थेने फेटाळले आहे.
सीबीआयने काल रात्री डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केली आहे. त्यावर सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, सनातन संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून तावडेंना न्यायालयात हजर केल्यानंतर योग्य भूमिका घेऊन न्यायालयीन लढा देऊ. तसेच आपचे नेते खेतान यांच्यावरही वर्तक यांनी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, खेतान यांचा इनकम सोर्स आहे का, याची चौकशी व्हावी. तर अटकेत असलेल्या तावडे हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता असून त्याने डॉ. दाभोलकरांवर हत्येपूर्वी एकदा हल्ला केला होता. तसेच त्यांच्या हत्येमागील मास्टरमाईंडलाही सीबीआयने लवकर अटक करावी, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली.