अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही मुलांनी करिअर म्हणून बघावे
अहमदनगर (प्रतिनिधी)। 12 - विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्याला कशात आवड आहे, हे पहावे मित्राने अमुक क्षेत्रात प्रवेश घेतला म्हणून आपणही त्यात प्रवेश घेऊ नये. तुम्हाला काय जमते हे महत्त्वाचे या करिता पालकांनी लक्ष द्यायला हवे. फक्त साचेबध्द करिअर व्यतिरिक्त इतर विषयांत करिअर करता येते. फक्त चांगले मार्क मिळाले की, तो आयुष्यात यशस्वी होतो असे नाही तर मार्काबरोबरच तुम्ही इतरांशी कसे वागता,बोलता,राहणीमान,तसेच तुमचे विचार,आचार हेही महत्त्वाचे आहे. अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही मुलांनी करिअर म्हणून बघावे, असे प्रतिपादन नगर कॉलेजचे सहायक अधिव्याख्याता डॉ. प्रीतम बेदरकर यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखा आयोजित व्हिजन 2016 अंतर्गत इ. 10 वी व 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बेदरकर बोलत होते. महानगर अध्यक्षा शारदा होशिंग, विस्तारक अमरदीप वायगावकर, दर्शना मार्केडे आदी उपस्थित होते.
बेदरकर पुढे म्हणाले, करिअर व व्यक्तिमत्त्व हे आज अत्यंत महत्त्वाचे असून या वयात घेतलेला योग्य निर्णय पुढील आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. पालकाची भूमिका तितकीच महत्त्वाची असून मुलांचा कल कोठे आहे हे पाहावे तसेच कोणत्याही प्रकारची बळजबरी न करता त्याला ज्या विषयात कल व आवड आहे त्यात त्याला करिअर करू दयावे अभाविप करीत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. शारदा हौशिंग म्हणाल्या अभाविप ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालविलेली परीषद आहे त्यामुळे जास्तीत जास्त कालेजमधील विद्यार्थ्यांनी यात सहभागी होउन विद्याथी परीषद बळकट करावी असे आवाहन केले.
सुरूवातीला अमोल बडे यांच्या सांघिक गीताने सुरूवात झाली कार्यक्रमप्रमुख दर्शना मार्केडे हिन प्रास्ताविक केले सुत्रसंचालन अवंती हौशिंग हिने केले आभार सुजाता गायके हिने मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी ओंकार कुलकणी,योगेश कुलकणी,मंगल भिंगारदिवे,शिवानी पोतदार आदीनी परीश्रम घेतले.