Breaking News

जिओ 90 दिवसांसाठी देणार मोफत 4जी इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग


नवी दिल्ली, दि. 11-  4जी सर्व्हिसच्या कमर्शिअल लॉन्चआधीच रिलायंस जिओने ग्राहकांसाठी फ्रि ट्रायल ठेवले असून ग्राहकांना त्यानुसार 90 दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड 4जी डेटा दिला जाणार आहे. 90 दिवसांच्या कालावधीत  ग्राहक त्यांना हवा तितका डेटा वापरू शकतात. या सिमकार्डवर तीन महिन्यांसाठी फ्रिमध्ये अनलिमिटेड 4जी डेटा आणि 4500 मिनिटाचे व्हॉईस कॉल दिले जाणार आहेत.
त्यासोबतच अनलिमिटेड कॉलींग आणि मॅसेजिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी रिलायंस जिओने 4जी सेवा त्यांच्या कर्मचा-यांसाठी सुरू केली होती. ही सेवा मिळवण्यासाठी काही अटी होत्या. त्या पुर्ण केल्यास ग्राहकांना 3 महिने फ्रि 4जी डेटा आणि अन्यही सुविधा मिळणार होत्या.