आता नव्या अवतारात दिसणार रोहित शर्मा
मुंबई, दि. 10 - आता नव्या रुपात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आपल्याला पहायला मिळणार असून डिजीटल कॉमिक सीरिज ‘हायपर टायगर्स’ या डिजिटल कॉमिक बुकमध्ये रोहित शर्मा हा ली़ड रोल करत आहे.
या कॉमिक बुकची निर्मिती ग्राफिक इंडिया, ब्रिटेनची आयएसएम कॉमिक्स आणि कोर्नोस्टोन स्पोर्टस यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे. ‘हायपर टायगर्स’मध्येही एक क्रिकेट टीमची स्टोरी आहे, जी टीम पर्यावरण आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी क्रिकेट खेळते. हायपर टायगर्समध्ये जे संघ आपले गाव आणि पर्यावरण रक्षणासाठी खेळतात अशा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट संघांचा समावेश करण्यात आला आहे. या कॉमिक बुकच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
हायपर टायगर्स इ-कॉमिक बुक गुरूवारपासून डेलीहंटवर उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्या दोन आठवड्यांसाठी ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, यानंतर वाचकांना या पुस्तकाच्या प्रत्येक पेजसाठी 10 रू खर्च करावे लागणार आहेत. याबाबत क्रिकेट आणि पर्यावरणाबाबत चांगले संदेश देण्यात आला आहे. कॉमिक वाचणे हा माझा छंद होता मात्र याचा हिस्सा बनेन असे कधी वाटले नव्हते. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असेही रोहितने म्हटले आहे.