Breaking News

शहरासह उपनगरात चोरट्यांचा धुमाकुळ

। दुचाकी चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय?  । पादचार्‍यांचे पैसे हिसकावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ  । पोलिस अधिक्षकांचे बदल्यांमुळे दुर्लक्ष?

अहमदनगर, दि. 10 - सध्या शहरात तसेच उपनगरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असुन शहरात दुचाकी चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली की काय असा संशय नागरीकांना येत आहेत. तर येणार्‍या - जाणार्‍यांवर पाळत ठेवुन पैसे हिसकावण्याचे प्रकारही वाढले आहे. गेल्या महिन्याभरापासुन पोलिसांनी अवैध्य धंद्यावर छपे टाकुन अनेकांना व्यवसाय बंद करण्यासाठी प्रवृत्त केल्याने या प्रकारात वाढ झाली असल्याची चर्चा शहरात रंगु लागली आहे. तसेच अधिकार्‍यांच्या आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांमुळे नविन अधिकार्‍यांवर पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी यांचा दबदबा राहिला नसल्याचे चित्र आहे. तर दुसर्‍या बाजुला नविन अधिकार्‍यांना चोरटे जुमानत नसुन नविन नियुक्त्या होत्याच पुन्हा अधिकार्‍यांना चोरट्यांनी चोरीच्या रुपाने एक प्रकारे सलामी दिली की काय असा प्रश्‍न ही आता नगरकरांना पडला आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी गस्त वाढविली नसल्याने नागरीकांमधुन गस्त वाढविण्याची मागणी होताना दिसत आहे.
दुचाकी चोरांनी पादचार्‍याचे साडेनऊ लाख लांबविले ः  सावेडी येथील कोनार्क अपार्टमेंट येथे उदय शिवाजी काकडे यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी 43 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. उदय काकडे (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांचे सावेडी येथे कोनार्क अपार्टमेंट येथे कार्यालय आहे. या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरांनी  आत प्रवेश केला. चोरांनी  कार्यालयातील साहित्याची उचकापाचक केली. त्यानंतर कार्यालयात असलेला लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, आयफोन, हार्डडिक्स असे साहित्य चोरले. त्यानंतर चोर कार्यालयाचा दरवाजा तसाच ठेवून निघून गेले. चोर हे वाहनातून पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार तोफखाना पोलिस तपास करत आहेत.
औरंगाबाद रोडवर मद्य विक्रीच्या दुकानात साडेचार लाखांची घरफोडी ः औरंगाबाद रोडवरील एका मद्य विक्रीच्या दुकानातील कामगाराने 4 लाख 47 हजार 506 रुपये ट्रेडर्सवाल्यांना न देता चोरी केले. मोहन निमसे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी बबन बाबुराव जाधव याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. नगर-औरंगाबाद रोडवर हॉटेल गारवाच्या मागे मोहन निमसे (रा. शेंडी) यांची कुमार बिअर शॉपीचे दुकान आहे. बबन बाबुराव जाधव (रा. सनी पॅलेस हॉटेलमागे, नगर) हा कामाला आहे. बबन जाधव याने गेल्या दीड महिन्यापासून व्यवहाराची रोकड 4 लाख 47 हजार 506 रुपये ट्रेडर्स वाल्यांना न देता चोरली आहे, असे निमसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पदचार्‍याचे पैसे हिसकावले ःस्टेशन रस्त्यावरील बसस्थानक परिसरात रस्त्याने जाणार्‍या पादचार्‍याला मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी धक्का देत नऊ लाख 72 हजार रुपायांची रोकड लांबवली. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.