Breaking News

मॅक्युलमची आयसीसीवर टीका

नवी दिल्ली, दि. 10 -  ख्रिस केन्र्सविरुद्ध सबळ पुरावे देऊनही आयसीसीने त्याला निर्दोष मुक्त केले. आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंध समितीने वास्तविक या  प्रकरणाला अतिशय सहजतेने घेतले. आपला तर आयसीसीवरुन विश्‍वासच उडाला आहे, असा घणाघाती आरोप न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलमने  केला आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलमने माजी क्रिकेटपटू ख्रिस केन्र्स याच्याविरुद्ध मॅचफिक्सिंगचे पुरावे दिले होते. नऊ आठवडे चाललेल्या या प्रकरणात  सुनावणीनंतर नोव्हेंबर 2015 मध्ये ख्रिस केन्र्सला मॅचफिक्सिंगच्या आरोपातून मुक्त करण्यात आले. मॅ
क्युलमने काल आयसीसीच्या एमसीसी स्पिरीट ऑफ  क्रिकेटचा खरपूस समाचार घेतला.
तो म्हणाला की, 2008 मध्ये मॅचफिक्सिंगकरिता माझा माजी हिरो केन्र्सने माझ्याशी संपर्क केला होता. एक वेळा कोलकातामध्ये मी पहिल्यांदा आयपीएल खेळत  होतो आणि नंतर न्यूझीलंड संघाच्या इंग्लंड दौर्यावर वॉर्सेस्टर येथे. मला वाटले की क्रिकेटच्या घरात या गोष्टी सांगणे योग्य राहील. साऊथवार्क क्राऊन  न्यायालयात जी साक्ष दिली, त्यावर अजूनही ठाम आहे. तो म्हणाला की, विश्‍वचषक 2011 मध्ये न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंध  समितीचे सदस्य जॉर्न होड्स यांनी आमच्याशी चर्चा केली. जर आमच्याशी कोणी मॅचफिक्सिंगकरिता कुणी संपर्क केला व ती माहिती लपविली, तरर आम्हीसुद्धा  गुन्हेगार ठरु. मी लोकांना केन्र्सविषयी सांगितले व त्यात माजी कर्णधार व माझा मित्र डॅनियल व्हेटोरी सहभागी होते.